पाटण तालुक्‍यातील 61 गावांमध्ये होणार नवीन रास्त भाव दुकाने

परवाने मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू 6 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

भगवंत लोहार

मल्हारपेठ – पाटण तालुक्‍यातील 61 गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकाने देण्यासाठी परवाने मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून या गावातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट सहकारी संस्था महिलांच्या सहकारी संस्था आदींना यासाठी अर्ज करता येणार असून त्यासाठी 6 ऑक्‍टोबर 2021 अखेर मुदत असल्याची माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली.

पाटण तालुका दुर्गम आणि डोंगराळ असल्याने अनेक गावे दुर्गम भागात आहेत. अशा गावातील ग्राहकांना रास्त भाव दुकानातून धान्य नेण्यासाठी सुलभता यावी तसेच काही कारणास्तव इतर दुकानांना जोडली गेलेली दुकाने व परवाने रद्द झालेली दुकाने अशा एकूण 61 गावांमध्ये नव्याने रास्तभाव दुकानासाठी परवाने दिले जाणार आहेत. त्यासाठी शासनाच्या अटी असून ही दुकाने प्राधान्याने ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राधान्याने रास्तभाव दुकानाचे परवाने मंजूर केले जाणार आहेत.

त्यासाठी 61 गावांमध्ये जाहीरनामे लावण्यात आले असून इच्छुक असणाऱ्या संस्थांनी 6 ऑक्‍टोबर 2021 अखेर तहसीलदार पाटण यांच्याकडे अर्ज करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

नव्याने रास्त भाव दुकानाचे परवाने मंजूर होणारी गावे –
चिटेघर, जाईचीवाडी, वन, आरल – कातवडी, आडुळ, चाफोली, जुंगटी, चोपदारवाडी, गिरेवाडी, शेडगेवाडी, येराडवाडी, पेठशिवापूर, किल्ले मोरगिरी, डोंगळेवाडी, गोकुळ तर्फ पाटण, काहिर, आंबेघर तर्फ मरळी, पाचगणी, आटोली, वाडी कोतावडे, बांधवट, विरेवाडी, माथनेवाडी, खराडवाडी, तोरणे, किसरुळे, मिरगाव, बाजे, गोषटवाडी, कामरगाव, गोवारे, मळा, पाथरपुंज, नाव, सुपुगडेवाडी, मुट्टलवाडी, चौगुलेवाडी (काळगाव) मस्करवाडी, ताईगडेवाडी, भिलारवाडी, वरेकरवाडी (कुंभारगाव) बोर्गेवाडी (कुंभारगाव) शिद्रुकवाडी (खळे), राहुडे, दुटाळवाडी, शितपवाडी, तामकडे, जोतिबाचीवाडी, चेवलेवाडी, नेरळे, पिंपळगाव, डोंगरोबाचीवाडी, तळीए, गोठणे, गोरेवाडी, घाटेवाडी, डागिष्टेवाडी, असवलेवाडी, पापर्डे बुद्रुक आदी गावांमध्ये नव्याने रास्त भाव दुकाने होणार आहेत. ही दुकाने प्राधान्याने ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत बचत गटासाठी आहेत. त्यासाठी जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. सदर गावांमधून इच्छुकांकडून अर्ज मागविले जात आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.