पुणे – ज्येष्ठ गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुधीर फडके यांना अनोखी मानवंदना दिली. त्यांच्या ‘चित्रकुटी’ या निवासस्थानासमोर एकत्र येत न्यू इंग्लिश स्कुलच्या 1000 विद्यार्थ्यांनी फडके यांना गायनाच्या माध्यमातून मानवंदना दिली.