पुणे – सार्वजनिक बॅंकिंग क्षेत्रातील अघाडीची बॅंक असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रने महाबॅंक लीड्स, डिजिटल महाबॅंक किसान क्रेडीट कार्ड, व्हर्च्युअल विझिटिंग कार्ड, इत्यादी डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. महाबॅंक लीड्समध्ये ग्राहकांना सहभागी करून घेऊन त्यांच्याकडून व्यवसाय प्राप्त करण्याची व त्यांना विविध कर्ज योजनांच्या द्वारे कर्ज देऊ करण्याची सुविधा आहे.
डिजिटल महाबॅंक किसान क्रेडीट कार्ड हे बॅंकेकडून वेळेवारी व पर्याप्त कर्ज सुविधा देऊ करण्यासाठी आहे. व्हर्च्युअल विझिटिंग कार्ड मध्ये बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना आपले व्हिझीटींग कार्ड आपल्या मोबाईल मध्ये साठवून ठेऊन ते समाज माध्यमाच्याद्वारे कोणालाही पाठवता येईल. त्याशिवाय बॅंकेच्या कामकाज पद्धती अधिक कार्यक्षम होण्यासाठी टीएटी मोनीटर, महा दर्पण, प्रायव्हेट क्लौड मार्केटींग कीट, कस्टमर हस्तपुस्तिका व संकलन नोंदवनी ऍप यांची सुद्धा सुरवात करण्यात आली. यासंबंधातील स्ट्रेटजी बैठकीत बॅंकेचे संचालक मंडळ, सरव्यवस्थापक व विभागीय प्रमुख सहभागी झाले होते.बॅंकेचे स्वोट विश्लेषण करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
आमच्या कल्पना आणि प्रयत्न हे बॅंकेच्या डिजिटल सेवा मजबूत करण्यासाठी व त्यायोगे बॅंकेचा ग्राहक आधार विस्तारण्याचा असल्याचे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी सांगितले. वाढत्या प्रमाणातील डिजिटल व्यवसाय बॅंकेकडे खेचण्याच हा प्रयत्न असल्याचे बॅंकेचे कार्यकारी संचालक ए बी विजय कुमार यांनी सांगितले. बॅंकेने 2022- 23 हे डिजिटल वर्ष म्हणून घोषित केल्याचे बॅंकेचे कार्यकारी संचालक श्री आशिष पांडे यांनी सांगितले.