नवी दिल्ली – नवी दिल्ली रेल्वे स्थानकात थांबलेल्या एक्स्प्रेसला आज दुपारी (शुक्रवारी) भीषण आग लागली. चंदीगड-कोचिवली एक्स्प्रेसच्या पॉवर कारमध्ये ही आग लागली आहे. अन्य दोन डब्यांपर्यंत आग पसरल्याने नवी दिल्ली स्थानकात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, आगीचं कारण अद्याप तरी समजू शकलं नाही.
A fire has broken out in rear power car of Chandigarh-Kochuveli Express at platform number. 8 of New Delhi Railway Station. Four fire tenders are present at the spot. All passengers have been evacuated safely. https://t.co/KWkKjrIHkU pic.twitter.com/AvqrfyQyda
— ANI (@ANI) September 6, 2019
रेल्वे स्थानकात ही एक्स्प्रेस थांबली होती. त्याचवेळी तिच्या पॉवर कारमधून धूर निघू लागला आणि त्यानंतर काही क्षणांतच या ठिकाणी भीषण आग लागली. थोड्या वेळात ही आग एक्स्प्रेसच्या अन्य दोन डब्यांमध्येही पसरली. आगीची माहिती कळताच प्लॅटफॉर्मवर असलेले प्रवासी इतरत्र पळू लागले. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीमुळे प्लॅटफॉर्मचे नुकसान झालं आहे.
Fire which had broken out in rear power car of Chandigarh-Kochuveli Express at New Delhi Railway Station, has now been doused. pic.twitter.com/wv2JoL9cBf
— ANI (@ANI) September 6, 2019