नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवीन COVID-19 व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ मुळे प्रभावित झालेल्या देशांमधून येणारी उड्डाणे थांबवण्याचे आवाहन केले आहे. करोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनने जगभरातील देशांची पुन्हा एकदा चिंता वाढविली आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधान मोंदीना प्रभावीत देशांच्या विमानांची उड्डीणे थांबविण्याची आज ट्विटकरत विनंती केली आहे.
I urge the PM to stop flights from those countries which are affected by new variant (of COVID-19). With great difficulty, our country has recovered from Corona. We should do everything possible to prevent this new variant from entering India: Delhi CM Arvind Kejriwal
(File pic) pic.twitter.com/uaIy5lYXIC
— ANI (@ANI) November 27, 2021
ट्विटमध्ये मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी त्या देशांची उड्डाणे थांबवावीत. जिथे कोविड-19 चा नवीन व्हेरियंट मिळाला आहे. मोठ्या कष्टाने आपला देश करोनापासून सावरला आहे. हा नवीन व्हेरियंट भारतात येण्यापासून रोखण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.” असे ट्विट आज मुख्यमंत्री केजरीवाल यांंनी केले आहे.
दरम्यान, नवीन कोविड व्हेरियंटमुळे आफ्रिकन देशांना येणारा धोका लक्षात घेता, केजरीवाल यांनी काल तज्ञांना आवश्यक सूचनांसह दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) कडे सादरीकरण करण्याची विनंती केली होती.