डीएसकेंच्या आलिशान वाहनांचा लिलाव करण्यास न्यायालयाची परवानगी

पुणे: गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात येरवडा कारागृहात असलेले प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या 13 आलिशान वाहनांचा लिलाव करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधीश ए. येस. भैसारे यांनी हा आदेश दिला आहे.

फेब्रुवारी 2018 साली ही वाहने जप्त करण्यात आली होती. त्यात बीएमडब्ल्यू, टोयोटा, पॉर्स, ह्युंदाई आदी कंपनीच्या चारचाकी तर ऑगस्था या दुचाकी कंपनीच्या दुचाकीचा समावेश आहे. लिलाव करण्यात येणार असलेली काही वाहने डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यासह कंपनीच्या नावावर आहेत.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीत येत्या काळात या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. तपास अधिकाऱ्यांनी वाहनांच्या माहितीचा तपशील तयार करून तो न्यायालयात सादर करावा. तसेच लिलाव कधी घेण्यात येणार आहे, याची माहिती तपास अधिकाऱ्याने द्यावी. असे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.