-->

पुण्यात नवे करोनाबाधित 328

पुणे – शहरात मागील चोवीस तासांत 328 करोना बाधित रुग्ण आढळले असून, उपचारादरम्यान 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 7 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. बरे झालेल्या 318 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील ऍक्‍टिव्ह करोना बाधितांची संख्या 2 हजार 902 झाली आहे. यापैकी 172 रुग्ण अत्यवस्थ आहेत.

शहरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 1 लाख 98 हजार 292 झाली असून, दररोज आढळणाऱ्या बाधितांचे प्रमाण असेच राहिल्यास येत्या आठवड्याअखेर दोन लाखांचा टप्पा गाठला जाण्याची शक्‍यता आहे.

आतापर्यंत 1 लाख 90 हजार 560 रुग्ण बरेही झाले आहेत. एकूण 4 हजार 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, चोवीस तासांत 4 हजार 414 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.