बीजिंग – कोरोनाच्या थैमानापासून दिलासा मिळण्याच्या दृष्टीने एक चांगली बातमी समोर आली आहे. चीनच्या सिनोवॅक बायोटेकने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीची ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. नुकतेच या लसीचे प्राथमिक परिणाम आणि निष्कर्ष जाहीर करण्यात आले. ही लस सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. या चाचणीत 13 हजार स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
ब्राझीलमधील प्रमुख बायोमेडिकल रिसर्च सेंटरपैकी एक असलेल्या साओ पाउलोमधील ब्यूटेनटन इन्स्टिट्यूटमध्ये लस चाचणी करण्यात येत आहे. कोरोनावॅक दोन डोसची लस आतापर्यंत सुरक्षित आढळली असल्याचे इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. या चाचणीत हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. ब्यूटनेटन इन्स्टिट्यूटचे महासंचालक डिमास कोवास यांनी सांगितले की कोरोनावॅक लसीची चाचणी संपूर्ण हजार स्वयंसेवकांवर केली जात नाही. तोपर्यंत लस प्रभावी असल्यासंबंधीचा डेटा जाहीर करता येणार नाही.
साओ पाउलोचे राज्यपाल जोओ डोरिया यांनी सांगितले की, देशात सुरू असलेल्या लस चाचणीपैकी ही कोरोनावॅक लस सर्वात सुरक्षित आणि सर्वात चांगल्या किंमतीत मिळणारी लस आहे. तर, ब्यूटनेटन इन्स्टिट्यूटचे महासंचालक डिमास कोवास यांनी सांगितले की, लस चाचणीचे हे परिणाम प्राथमिक आहेत.
या लस चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांवर संशोधकांचे लक्ष असणार आहे. तुर्की आणि इंडोनेशियात या लशीची चाचणी सुरू आहे.