पुणे – शहरात रविवारी दिवसभरात करोनाचे 294 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 317 जण करोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 1 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
शनिवारी दिवसभरात स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 4 हजार 14 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 294 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले. बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 लाख 74 हजार 13 वर पोहोचली आहे.
शहर परिसरातील विविध रुग्णालयांत 5 हजार 125 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 387 रुग्ण अत्यवस्थ आहेत, तर 224 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 163 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर, 800 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
करोनामुळे मृत्यूू झालेल्यांची संख्या 4 हजार 538 वर पोहोचली आहे. आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 64 हजार 350 झाली आहे.