नवीन मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू – डॉ. जितेंद्र सिंह

Madhuvan

नवी दिल्ली – नवीन मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेमध्ये एका लेखी उत्तरामध्ये दिली. 

केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ दि. 26 ऑगस्ट रोजी पूर्ण झाला आहे. तसेच एका माहिती आयुक्तांचा कार्यकाळ दि. 25 सप्टेंबर रोजी पूर्ण होत आहे.

त्यामुळे या रिक्त पदांवर वेळेवर नियुक्ती करण्यासाठी प्रसार माध्यमातून दि. 9 जुलै रोजी जाहिरात देण्यात आली असून ही प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. यानुसार एक मुख्य माहिती आयुक्त आणि सहा माहिती आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

ही नियुक्तीची प्रक्रिया उच्चस्तरीय समितीमार्फत नियमित कार्यपद्धतीनुसार पूर्ण करण्यात येत आहे. त्यासंदर्भात अर्जांची छाननी करून उमेदवारांची लघुसूची तयार करण्यात येत आहे, असे यावेळी सभागृहामध्ये सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.