प्रस्तावित – 46 कार्यान्वित – 17
पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ई-बससाठी सुरु करण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनवर चार्जिंग पॉईंट वाढविण्यात आले आहेत. पुण्यात भेकराई येथे तर पिंपरी-चिंचवड येथील निगडी आगारात ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे. मात्र, येथे चार्जिंग पॉईंटची संख्या कमी असल्याने त्यात वाढ करण्यात आली असून आत्तापर्यंत निगडी आगारात 17 चार्जिंग पॉईंट कार्यरत करण्यात आले आहे.
पीएमपी प्रशासनाने ई-बसेसची खरेदी केली आहे. मात्र, बसेससाठी चार्जिंग पॉईंट पुरेशे नसल्याने पीएमपीच्या ई-बसेसना चार्जिंग अभावी फेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. याची दखल घेत, पीएमपी प्रशासनाने निगडी आगारात नव्याने चार्जिंग पॉईंट निर्माण करण्यास सुरुवात केली असून निगडी आगारात एकूण 46 प्रस्तावित चार्जिंग पॉईंट आहेत. त्यापैकी 17 पॉईंट सुरू करण्यात आले आहेत.
यापूर्वी निगडी आगरात केवळ 6 चार्जिंग पॉईंट होते. यामुळे येथील बसेसची पूर्ण चार्जिंग होत नव्हती. निगडी आगारात आजघडीला 35 ई-बसेस आहेत. मात्र, त्याप्रमाणात चार्जिंग पॉईंट नसल्याने चार्जिंग अभावी बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. मात्र, नव्याने झालेल्या 11 चार्जिंग पॉईंटमुळे बसच्या चार्जिंगची समस्या मिटली आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत पुण्यातील भेकराई आगारात 90 तर, निगडी आगारात 70 ई-बसेस येणार आहेत. यामुळे नवीन चार्जिंग पॉईंट निर्मिती करणे आवश्यक आहे. एका बसला चार्जिंग करण्यासाठी सुमारे 2 ते 3 तास वेळ लागतो. यामुळे