नव वधूची हरवलेली अंगठी प्रामाणिक महिलांकडून परत

सोमेश्वरनगर – एकीकडे लग्नसमारंभामधुन चोरीचे प्रमाण वाढलेले दिसत असताना सोमेश्वरनगर मध्ये मात्र वधु ची हरवलेली सोन्याची अंगठी परत करण्यात आली आहे. कार्यालयात झाड-लोट करणाऱ्या महिलाकडुन ही अंगठी परत देण्यात आली आहे.

दरम्यान, परिस्थीतीने गरीब असलेल्या व्यक्तीत अद्यापही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे या घटनेतुन दिसुन आले. स्वाती नरेंद्र गायकवाड, पोर्णीमा विशाल गायकवाड, मोनीका सागर चव्हाण असे या प्रामाणीक महिलांची नावे आहेत.

शनिवारी (दि.२३) सोमेश्वरनगर येथील अक्षय गार्डन येथे गणेश आळंदीकर यांची मुलगी सोनम हिला साखरपुड्यात एक किमती अंगठी देण्यात आली होती.

मात्र हळदी समारंभाच्या कार्यक्रमावेळी अंगठी हरवली असून, ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर काम करणाऱ्या महिलांना अंगठी शोधण्यास सांगीतली.

सायंकाळी विवाहाच्या वेळी महिलांना अंगठी सापडली असून, महिलांनी प्रामाणिक पणे अंगठी उपस्थित परिवाराकडे सोपवली.

त्यानंतर, लग्नाला उपस्थीत असलेले नातेवाईक पिंपरी चिंचवड चे माजी उपमहापौर कैलास भांबुर्डेकर यांच्या हस्ते या महिलांना रोख बक्षीस व साड्या देण्यात आल्या.

सदर महिलांच्या प्रामाणीक पणाबद्दल कार्यालयाचे मालक आर. एन. शिंदे आणि  व्यवस्थापक संजय शिंदे यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.