अहमदनगर : ‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांचे नवे ऍप

* शेअरकर नावाचे ऍप केले विकसित
* आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळकटी
कोपरगाव (प्रतिनिधी) –
भारत-चीन संबंध बिघडल्याने भारताने चीनच्या 59 ऍप्सवर बंदी आणली आहे. त्यात शेअर इट व झेंडर ऍप्सचा समावेश होता. त्यामुळे फोटो, फाइल, व्हिडिओ, गाणी शेअर करण्यासाठी कोणते ऍप वापरायचे, असा प्रश्न होता. मात्र संजीवनी पॉलिटेक्‍निकच्या सर्वेश सुभाष होन व जयेश संजय देशमुख या विद्यार्थ्यांनी शेअरकर हे नवीन ऍप विकसित केले आहे. त्यांचे हे पाऊल म्हणजे आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळकटी दिल्या सारखेच आहे, अशी माहिती संजीवनी पॉलिटेक्‍निकच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सर्वेश व जयेशच्या यशाबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी त्यांचे व त्यांचे आई-वडील सुभाष हरिभाऊ होन, सारिका सुभाष होन, संजय संभाजीराव देशमुख व सरला संजय देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, प्राचार्य ए. आर. मिरीकर व विभाग प्रमुख प्रा. जी. एन. जोर्वेकर, प्रा. एम. व्ही. खासणे उपस्थित होते.

सत्कार प्रसंगी सर्वेश व जयेश यांनी ऍप कसे विकसीत करावे, याचे प्रशिक्षण आम्हाला संजीवनीतून मिळाले. सरकारने चिनी बनावटीच्या ऍपवर बंदी घातल्यावर संधी म्हणून आम्ही नवीन ऍप विकसीत करण्याचा प्रयत्न केला व त्यात यशस्वीही झालो. हे ऍप पूर्णतः भारतीय असून, वापरण्यास अत्यंत सोपे व सुरक्षित आहे. एक जीबीपर्यंत असलेल्या एक्‍सल, पिक्‍चर, व्हिडिओ व कोणतीही फाइल फक्त एका मिनिटात शेअर करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.