कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आमचे ठरलय, आता दक्षिण उरलय अशी नवी गर्जना केलीय. यामुळं कोल्हापूर दक्षिणेतील वातावरण ढवळून निघालय. पाहुयात एक रिपोर्ट..
कोल्हापूर – 2014 ला भाजपच्या अमल महाडिक यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबीयांमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत अमल यांचे वडील माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पराभवाची धूळ चारत सतेज पाटील यांनी बदला घेतला.
पुढं 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक हे आघाडीकडून उमेदवार असतानाही त्यांना मदत न करता आमचं ठरलंय म्हणत सतेज पाटील यानी विरोधाची उघड भूमिका घेतली.त्याचा परफेक्ट परिणाम झाल्यानंतर राज्यभर आमचं ठरलंय पॅटर्नची जोरदार चर्चा झाली.
आता पुतण्या ऋतुराजसाठी सतेज पाटील यांनी कंबर कसली असून आमचे ठरलय,आता दक्षिण उरलय म्हणत अमल महाडिक यांना आव्हान दिलय.या आव्हानांची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू असून सतेज पाटलांच्या या रणनीतीला महाडिक गट आता कसे प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलंय.
एकुणच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अर्थात महाडिक विरुद्ध पाटील असाच सामना रंगणार असला तरी आता आमच ठरले आता दक्षिण उरले ही घोषणा मात्र सर्वदुर पसरणार आहे हे नक्की..