सातारा – जिल्ह्यातील आणखी 66 जणांचा करोना रिपोर्ट पॉंझिटिव्ह आल्याची माहिती शनिवारी जिल्हा प्रशासनाने दिली. 56 जण पॉंझिटिव्ह आल्याची माहिती शनिवारी सकाळी तर 10 जणांचा अहवाल सायंकाळी मिळाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1255 झाली आहे. जिल्ह्यात दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. खटाव तालुक्यातील मुंबईवरून प्रवास करून आलेला पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय (सारीची रुग्ण) महिला या दोन करोनाबाधित रुग्णांचा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या 10 रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील बदेवाडी येथील 1, उडतारे येथील 1, पसरणी येथील 1 व वाई येथील 2, सातारा तालुक्यातील निनाम पाडळी येथील 1, कराड तालुक्यातील कार्वे नाका 1, तळबीड 1, खटाव तालुक्यातील शेनवडी 1, पाटण तालुक्यातील वाझोली येथील 1 यांचा समावेश आहे. माण तालुक्यातील खडकी येथील 75 वर्षीय करोनाबाधित महिलेला मायणी येथे आज पहाटे मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्यांपैकी 56 जण पॉंझिटिव्ह आले. त्यामध्ये निकट सहवासातील 51, प्रवास करुन आलेले 4, आयएलआय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग) 1 अशा एकूण 56 नागरिकांचा तसेच 36 पुरुष व 20 महिलांचा समावेश आहे. या 56 जणांमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड येथील 28 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील उंब्रज येथील 23 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 41 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील 14 वर्षीय महिला, रविवार पेठेतील 7, 12, 16, 38, 68, 42, 40, 32, 20 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय दोन युवती व 25 वर्षीय महिला, मलठण येथील 39 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील पळशी रोड शिरवळ येथील 24 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनी येथील 30 व 23 वर्षीय पुरुष.
देशमुख आळी येथील 35 व 45 वर्षीय महिला, लोणंदमधील मऱ्याची वाडी येथील 34 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील जिहे येथील 49, 36, 20, 8, 68, 43, 61, 81, 62 वर्षीय पुरुष व 42, 57, 4, 30, 19, 3, 10, 32, 70, 55 वर्षीय महिला, श्रीनाथ कॉलनी, फलटण रोड येथील 20 वर्षीय पुरुष. धावली येथील 17 वर्षीय पुरुष, पानमळेवाळी येथील 43 वर्षीय महिला, माण तालुक्यातील कुळकजाई येथील 25 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील मलवडी येथील 24 वर्षीय पुरुष, मोरगिरी येथील 33 वर्षीय पुरुष, कासरुंड येथील 35 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 16 व 24 वर्षीय महिला, बेलवडे येथील 36 वर्षीय पुरुष, सूर्यवंशीवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, गोकूळ येथील 18 वर्षीय युवक, मारुल येथील 35 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील धर्मपूरी येथील 46 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.