पुणे – शहरात आणखी 351 जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सहा जण शहराबाहेरील आहेत. दिवसभरात 423 जण करोनामुक्त झाले आहेत.
शहरात आता करोनाच्या नव्या बाधितांचा आकडा 1 लाख 71 हजार 769 झाला असून, 1 लाख 61 हजार 979 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत करोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 4,486 झाली आहे.
सध्या 5304 जण करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण असून, 425 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील 250 जण व्हेंटिलेटरवर आहेत. शनिवारी दिवसभरात 3,736 स्वॅबटेस्ट करण्यात आल्या.