पुण्यात नवीन 241 करोनाबाधित; मृतांचा आकडा काही कमी होईना

पुणे – शहरातील आज नव्याने केवळ 241 बाधित सापडले. तर 639 बाधित करोनामुक्त झाले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून बाधित संख्या तीनशे ते पाचशेच्या जवळपास सापडत असल्याने, करोनामुक्तांची संख्याही कमी झाली आहे. मात्र, करोनामुळे मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण अजूनही कमी होत नाही. गेल्या 24 तासांत 25 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहर हद्दीत 22 तर ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यातील 3 जणांचा समावेश आहे.

 

रविवारी आणि सोमवार नमुने तपासणीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सोमवारी बाधित दीडशेपेक्षाही खाली आली होती. दरम्यान, मंगळवारी (दि. 27) दिवसभरात केवळ 2 हजार 331 संशयिताची तपासणी करण्यात आली.

 

तर आतापर्यंत तब्बल 7 लाख 25 हजार 743 जणांच्या तपासणी अहवालातून 1 लाख 60 हजार 86 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील आतापर्यंत तब्बल 1 लाख 49 हजार 919 बाधित करोनामुक्त झाले आहेत.

 

शहरातील सक्रीय बाधितांची संख्या सहा हजारापर्यंत खाली आली आहे. त्यामध्ये 620 बाधित अत्यवस्थ आहेत. 346 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 274 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.