पुणे : शहरात करोनाच्या नव्या 234 बाधितांची वाढ झाली, तर 306 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आतापर्यंत सुमारे 8 लाख 89 हजार 346 करोना संशयितांची स्वॅबटेस्ट करण्यात आली. त्यातून 1 लाख 76 हजार 462 जण पॉझिटिव्ह निघाले. त्यातील 1 लाख 66 हजार 855 जण करोनामुक्त झाले आहेत.
शहरात सध्या 5020 रुग्ण ऍक्टिव्ह असून, त्यातील 391 रुग्ण क्रिटिकल आहेत. त्यापैकी 226 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 165 रुग्ण अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरशिवाय उपचार घेत आहेत. 860 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
गेल्या चोवीस तासांत करोनाने 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4,587 आहे. दिवसभरात 2,540 स्वॅबटेस्ट घेण्यात आल्या.