सातारा – जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 133 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 5 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 3, शनिवार पेठ 2, सदरबझार 2, प्रतापगंज पेठ 1, पिरवाडी 1, शाहूनगर 2, जळगाव 1, कोडोली 5, साबळेवाडी 1, आरळे 1, सांबरवाडी 3.
कराड तालुक्यातील मलकापूर 2, किवळ 1.
पाटण तालुक्यातील विहे 1, रासती 1, गरवडे 1, बहुले 2.
फलटण तालुक्यातील फलटण 3, वाठार निंबाळकर 2, धुळदेव 2, आदर्की बु 1, नांदल 1, पिंपळवाडी 2, , साखरवाडी 1, आदर्की 1, तरडगाव 1, मुरुम 1, तावडी 1.
खटाव तालुक्यातील वादुस 1, मोरवे 1, गणेशवाडी 1, खटाव 1.
माण तालुक्यातील बिदाल 2, नरवणे 1, दहिवडी 2, मोही 1, म्हसवड 2, रांजणी 1, कुळकजाई 1, झाशी 1, मलवडी 1, पिंपरी 1.
कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली 1.
वाई तालुक्यातील देगाव 1, कळंबे 1, उडतारे 1, बोपेगाव 1.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 4, अहिरे 1, सुखेड 1.
इतर 1, वाठार 2, जुलेवाडी 1.
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय येथील 46 व आघारकर येथील 8 असे एकूण 54 रुग्णांची माहिती तांत्रिक कारणांमुळे उपलब्ध न झाल्याने यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही
पाच बाधितांचा मृत्यू
लिंब, ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, बोंबाळे ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुष, गडकर आळी सातारा येथील 32 वर्षीय पुरुष, सुरुर ता. वाई येथील 71 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.