कधीही दुर्लक्ष करू नये घोट्याच्या लचकेकडे

एक्स-रेमध्ये फ्रॅक्चर दिसत नाही

घोट्याच्या लचकेकडे कधीही दुर्लक्ष करू नये किंवा फक्त लचक भरली आहे किंवा एक्स-रेमध्ये फ्रॅक्चर दिसत नाहीये, असं म्हणून बेसावध राहू नये. घोट्यातील लचकेवर योग्य उपचार केले नाहीत तर ते पूर्णत: बरे होत नाही वा योग्यप्रकारे बरे होत नाही. यामुळे किरकोळ कारणानेही घोट्यामध्ये त्रास होऊ शकतो.

घोट्यातील सांधा बिजागरासारखा असतो. त्याचा पृष्ठभाग लहान असतो. या बिजागरावर शरीराच्या जवळजवळ संपूर्ण वजनाचा भार येतो. घोट्यामध्ये चार सांधे असतात. घोट्याशी संबंधित असलेला सर्रास आढळणारा ऑर्थोपेडिक प्रश्न म्हणजे, घोट्याला एकसंध ठेवणा-या अस्थिबंधमध्ये फट वा दुखापतीमुळे लचक भरणे. दुखापत होण्याची जास्त शक्यता असलेले अस्थिबंध म्हणेज अँटेरिऑर टॅलोफायब्युलर लिगामेंट. घोट्याच्या लचकेकडे कधीही दुर्लक्ष करू नये किंवा फक्त लचक भरली आहे किंवा एक्स-रेमध्ये फ्रॅक्चर दिसत नाहीये, असं म्हणून बेसावध राहू नये. घोट्यातील लचकेवर योग्य उपचार केले नाहीत तर ते पूर्णत: बरे होत नाही.

घोट्याच्या विविध भागांमध्ये विविध अस्थिबंध असतात. फाटण्याचं प्रमाणही वेगळं असतं. फाटण्याच्या विविध स्थिती व त्यावरील उपाय पाहू.
मध्यम भेगा, मोठी सूज, कोमलपणा आणि संभाव्य खरचटलेले आहे. स्ट्रेस एक्स-रेमध्ये सांध्यांची किरकोळ अस्थिरता दिसून येईल. घोट्याला १ ते ३ आठवडे प्लास्टर इममोबिलायझेशनची व इलॅस्टिक आधाराची गरज आहे. वजन घेणं कटाक्षाने टाळायला हवं. झोपून राहण्याची आवश्यकता नाही. कुबड्याच्या मदतीने चालणंही उपयोगी ठरतं.

मसाज करू नये. आग होऊ नये म्हणून काही दिवस या बाबतीतील औषधं घेणं गरजेचं आहे. त्यानंतर रुग्णाला हालचालीची व स्नायू बळकट होण्यासाठी घोट्याला व्यायामाची आवश्यकता असते. मोठय़ा भेगा, प्रचंड सूज, वेदना आणि खरचटलेले आहे. हालचाली केल्यावर तीव्र वेदना होतात. स्ट्रेस एक्स-रेमध्ये सांध्यांची लक्षणीय अस्थिरता दिसून येईल. घोट्याला सहा आठवडे प्लास्टर इममोबिलायझेशनची गरज आहे. या काळात वजन उचलणं कटाक्षाने टाळायला हवं. कुबड्याच्या साहाय्याने चालणं उत्तम ठरतं.

आग होऊ नये म्हणून ७ ते १० दिवस या बाबतीतील औषधे गरजेची आहेत. त्यानंतर इलॅस्टित आधार, विशिष्ट वजन उचलणे यास परवानगी मिळू शकते, परंतु फिजिओथेरपीच्या मदतीने (शेकवणे, वॅक्स बाथ). आजूबाजूचे स्नायू बळकट होण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. घोट्याला लचक बसली असेल तर क्रेप बँडेजच्या साहाय्याने स्वत: उपचार करू नयेत.

सांध्याला मसाज करणं कटाक्षाने टाळावं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.