नेवासा – छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य ६ जून २०२३ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी कडाक्याच्या उन्हात रस्त्याच्या कडेला तासन् तास एसटीची वाट पाहणाऱ्या माता भगिनी आणि वृद्ध दांपत्य तसेच विद्यार्थ्यांसाठी मांडव देऊन महिनाभर प्रवाशांसाठी निवारा उभा केलेला होता. या गोष्टीला गांभीर्याने घेत पोटे यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील प्रवासी नागरिक रस्त्यावर कडाक्याच्या उन्हात पावसात रस्त्यावर सुरक्षित नसल्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. भेंडा व नेवासा फाटा येथील चित्रफीत बैठकीत पडद्यावर दाखवली होती, त्यामुळे तात्काळ रस्ता सुरक्षा समितीने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास प्रहार स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिलेला होता.
या मागणीला गांभीर्याने घेत रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश काढून प्रत्येक ग्रामपंचायत इकडून अहवाल मागवला होता. या मागणीवरून भेंडा येथे दहा लाख रुपये प्रवासी निवारा बस स्थानकाला मंजूर करण्यात आलेले असून शनिवार (दि.१२) रोजी दसऱ्याच्या मुहूर्ताचे औचित्य साधून जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवासी निवारा बस स्थानक उद्घाटन एका वृद्ध प्रवासींच्या हस्ते नारळ वाढवून व एका प्रवासी महिलेच्या हस्ते रिबन कापून उद्घाटन केले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्ष नेवासा तालुका कार्यकारिणीमध्ये जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांच्या हस्ते प्रवेश करताना धनगरवाडी, खामगाव नं. १, चिकणी खामगाव ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रामभाऊ राव यांची नेवासा तालुका वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच नेवासा तालुका सोशल मीडिया प्रमुख पदी सचिन साठे व तालुका संघटक पदी दीपक सोलट यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे ज्येष्ठ जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, प्रहार धरणग्रस्त कृती समितीचे जिल्हाप्रमुख कृष्णा सातपुते, नेवासा तालुका प्रहार चालक-मालक वाहतूक संघटना प्रमुख चंद्रकांत तात्या नवथर, नेवासा तालुका प्रमुख जालिंदर आरगडे, नेवासा तालुका युवक कार्याध्यक्ष देविदास मनाळ, भेंडा शाखा अध्यक्ष मोतीराम शिंदे, भेंडा ग्रामपंचायत माजी सरपंच दादासाहेब गजरे, सौंदाळा सोसायटी चेअरमन राजेंद्र चामुटे, बंडू आरगडे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू वाघडकर, विठ्ठल नागरी पतसंस्थेचे चेअरमन कृष्णा गव्हाणे, खाटीक, संजय बोधक आदी उपस्थित होते.
“बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला या तत्त्वावर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे मावळे नामदार बच्चू कडू साहेबांच्या मार्गदर्शनात काम करत असतो. दहा लाख रुपये शासनाकडून आम्ही मंजूर करून आणले, त्याच्या छायांकित सर्व प्रति प्रवासी निवारा बस स्थानकामध्ये लावल्या आहेत. आम्हाला उद्घाटन करून श्रेय घेण्याची इच्छा आम्हाला नाही, परंतु आमच्या कामाचे श्रेय दुसरे कोणी नाव टाकून घेणार असतील तर आम्ही आमचा प्रहार केल्याशिवाय राहत नाही” – अभिजीत पोटे, जिल्हाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष, अमदनगर.