राजेंद्र वाघमारे
नेवासा – नेवासा विधानसभा मतदार संघात होणाऱ्या निवडणूकीत पुन्हा एकदा आमदार बनण्यासाठी इच्छूक मंडळी राजकीय फडात चांगलीच कसरत करण्यासाठी सज्ज झाली असल्याचे सुकृतदर्शनिय दिसून येत आहे.
राज्याचे माजी मंञी आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या बरोबर भाजपातून दुसरे प्रतिस्पर्धी इच्छुक युवानेते ऋषिकेश शेटेही राजकीय मैदानात उतरुन त्यांनी आता तालुक्यात संपर्क दौरे सुरु केले आहेत तर तालुक्यात आजी – माजी आमदारांच्या विरोधात तिसरा पर्याय म्हणून आमआदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके यांनी तालुक्यातील काही घटक पक्ष बरोबर घेवून जनतेला तिसरा पर्याय खुला करुन देण्याचा मनसुबा आखला आहे त्यामुळे आता होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत इच्छूकांना राजकीय नेवाशाच्या राजकीय फडात “आमदार झाल्या सारखे वाटतय”…? अशीच राजकीय परिस्थिती तालुक्यात निर्माण झाल्यामुळे राजकीय मैदानात प्रमुख नेत्यांबरोबच इतर इच्छुकांनाही प्रयत्नांची पराकष्ठा सुरु केल्याचे दिसून येत असल्यामुळे आता प्रत्येकालाच आमदार झाल्यासारख वाटत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला इच्छूकांच्या कारनाम्यांमुळे चांगलीच करमणूक होतांना दिसून येत आहे.
राज्याचे माजी मंञी आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधात आपले राजकीय बस्तान बसविण्यासाठी विरोधकांचे संपर्क दौरे सुरु असतांनाच आ.गडाखांचीही घोंगडी बैठक सुरु झालेली आहे तालुक्यातील वाड्या – वस्त्यांवर बैठकांचा जोर वाढवला जात असून आ.गडाख गटात कार्यकर्त्यांचा प्रवेशही होतांना दिसून येत आहे त्यामुळे होणाऱ्या निवडणूकीत सध्या सत्ताधारी आणि विरोधकांनाही आपल्यालाच राजकीय वातावरण फायदेशीर असल्याचा साक्षात्कार होवू लागला असून प्रत्येकालाच नेवासा मतदार मतदार संघात आमदार झाल्यासारख वाटायला लागल्यामुळे जनता – जनार्धन होणाऱ्या निवडणूकीत काय चमत्कार करणार? याकडे राजकीय निरिक्षकांच्या नजरा लागून आहेत.
स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असणार असल्याचा राजकीय कयास बांधला जात असून वाढलेल्या इच्छुकांच्या मतदानाचा फटका कोणाला बसणार? आणि कोण तरणार? आणि कोणाला फटका बसणार? याकडे राजकीय नेत्यांच्या नजरा लागून आहेत.
राजकीयदृष्ट्या नेवासा विधानसभा मतदार संघ हा अनेकदा राजकीय निरिक्षकांच्या अंदाजाला हुलकावणी देवून चमत्कार घडविणारा तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे त्यामुळे पुढील राजकीय हेतू आणि दिशा साबीत करण्यासाठी जनता – जनार्धन हीच खरी कवच कुंडली मानुन राजकीय रणांगणातील लढा महत्वाचा ठरणार आहे राज्याचे दिग्गज नेते महसूलमंञी राधाकृष्ण विखे – पाटील यांचे सुपूञ डॉ.सुजय विखे – पाटील यांचा नगर दक्षिणमधून झालेल्या पराभवामुळे जिल्ह्यातील अनेक सत्ताधिकारी आणि विरोधी नेते वठणीवर आलेले असून निवडणूकीत पैसे हा काही एकमेव पर्याय नसल्याचे राजकीय आखाड्यात दाखवून देवून जनतेच्या मनात असलेलाच उमेदवारच विजयी होवू शकतो?
हाच मंञ लोकसभा निवडणूकीत दिसून आल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे चालचलन सुधारल्याचे मतही सुज्ञ मतदारांतून व्यक्त होतांना दिसून येत असल्यामुळे राजकीय नेतेमंडळी आता गर्दीपेक्षा दर्दी कार्यकर्त्यांची विश्वासू फौज होणाऱ्या निवडणूकीत काम करण्यासाठी तयार करण्यासाठी राजकीय रणांगणात विश्वासू कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी सक्रिय होवून विधानसभा निवडणूकीचे राजकीय जुगाड बसविण्यासाठी मैदानात कसरत करतांना दिसून येत आहे.