कर्तव्यदक्ष महिला कॉन्स्टेबलने केले असे काही की नेटकऱ्यांनी केला ‘सॅल्यूट’

पुणे – अनेकदा नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या ट्रॅफिक पोलीस आपल्याला अनेकदा दिसतात. परंतु, पोलिसांच्या वर्दीतल्या माणुसकीचे दर्शनही अनेक वेळा पाहायला मिळते. असाच एक कर्तव्यदक्ष महिला पोलिसांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पुण्यातील एस.पी. कॉलेज चौकात बाईक आणि रिक्षा अपघात झाला होता. या अपघातात दुचाकी अणि रिक्षाच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. यामुळे भर चौकात रस्त्यावर काचांचा खच साचला होता.

रस्त्यावर साचलेल्या काचांमुळे इतर कोणाचाही अपघात घडू शकतो, या भावनेने महिला कॉन्स्टेबल  रजिया फैयाज सय्यद  यांनी स्वतः झाडू मारुन काचा साफ केल्या आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

महिला कॉन्स्टेबल रजिया फैयाज सय्यद पुण्यातील खडक वाहतूक विभागात कार्यरत असून पोलीस उपनिरीक्षक भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे कर्तव्य पार पाडले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.