मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. बॉलीवूडशी संबंधित बऱ्याच जणांनी या इंडस्ट्रीतील नेपोटिझमला लक्ष्य केले आहे.
सोशल मीडियावर #JusticeForSushantSinghRajput चे हॅशटॅग बऱ्यापैकी ट्रेंड होत आहे.
अनेक ट्विटर यूजर्स करण जोहर यांना फिल्म इंडस्ट्रीत नेपोटिझम प्रोत्साहन देण्यासाठी दोष ठरवित आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री ‘कंगना राणौत’ने थेटपणे करण जोहरवर आरोप केले होते. “करण जोहरने कधीच सुशांतला आपल्या पार्ट्यांना बोलावले नाही. त्याच्यासारख्या मुव्ही माफियांमुळे इंडस्ट्रीतील अनेकांवर अन्याय होतोय”, असा आरोप तिने केला होता.
दरम्यान, कंगनाच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट करण जोहर’चा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. त्यामुळे सोशल मीडियावर करणच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सुमारे 5 लाख लोकांनी करणला अनफॉलो करत मोठा झटका दिला आहे.