#Indian Idol 12: ‘झूठ बोलने से बात बन जाती है, काम चल जाता है’

नेटकऱ्यांकडून झालं स्पर्धकाच्या गरिबीच पितळ उघड

मुंबई – सोनी टेलिव्हजन वरील प्रसिद्ध सिंगिंग रिऍलिटी शो ‘इंडियन आयडल’ने आजवरच्या सर्वच सिंगिंग कार्यक्रमांचे रेकॉर्ड मोडले आहे. इंडियन आयडलचे आजवरचे सर्वच सिझन हिट गेले आहेत. यंदाचा सिझन मधील सगळ्याच स्पर्धकांच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडल एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. शो मधील एका स्पर्धकाने शोमध्ये त्याच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधीत खोटे बोलले असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘सवाई भट्ट’ असं या स्पर्धकाचं नाव असून, हा राजस्थानमधील रहिवासी आहे.

इंडियन आयडलच्या ऑडिशन दरम्यान त्याने बाहुल्यांचा खेळ दाखवून त्यातून मिळणाऱ्या पैशांनी घर चालवत आहे आणि राहत असलेले घर देखील छोटे आहे असे त्याने म्हटले होते. पण आता सोशल मीडियावर त्याचे काही जुने फोटो व्हायरल झाले असून, अनेकांनी सवाई भट्ट आणि इंडियन आयडलवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सवाई स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. त्याचा लूक सुद्धा पूर्ण पणे हटके दिसत आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या या फोटोंबाबत अद्याप इंडियन आयडलच्या सेटवरून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.