Shaheer Sheikh Troll | ‘महाभारत’ या मालिकेत पौराणिक गोष्टी सांगण्यात आल्याने याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. शाहीर शेखने 2013 मध्ये आलेल्या ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेत अर्जुनची भूमिका साकारली होती. अलीकडेच शाहीर तिरुपती मंदिरात गेला होता.
शाहीरसोबत सौरव शर्मा, अर्पिता रांका, ठाकूर अनूप सिंग आणि इतर काही कलाकारही होते. येथील काही फोटो शाहिर शेखने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु या फोटोनंतर शाहीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
यावेळी शाहीर शेख आणि अहम शर्माने दाक्षिणात्य लूक केला होता. शाहीर शेखनं शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये कलाकारांनी मुंडू नेसली आहे. तर ही पोस्ट शेअर करत शाहीरनं ‘#मुंडू #गॅन्ग।’ असे कॅप्शन दिले आहे. पण, रमजान महिन्यात शाहीरने मंदिरात जाणे काही लोकांना आवडले नाही.
View this post on Instagram
अनेक जण त्याला धर्माचे धडे शिकवतानाही दिसले. काहींनी त्याला ट्रोल करत “रमजानमध्ये असे करणे योग्य आहे का? “त्याने उपवास ठेवला नाही का?” असा सवाल केला आहे. मात्र, शाहीरने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
शाहीर शेखने ‘महाभारत’ मालिकेत अर्जुनची भूमिका केली होती. ‘महाभारत’ ही मालिका १६ सप्टेंबर २०१३ ते १३ ऑगस्ट २०१४ या कालावधीत प्रसारित झाली होती. तर 2023 मध्ये त्याने ‘दो पट्टी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. Shaheer Sheikh Troll |
हेही वाचा: