जगभरातून नेटफ्लिक्सला तब्बल १.५ कोटींपेक्षा जास्त नवे सब्सक्राइबर्स

मुंबई –  कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे सगळे काही ठप्प आहे. मात्र या काळात सोशल मीडियाचा वापर करत सर्व लोक कोरोना बाबत जनजागृती करत आहे. तर दुसरीकडे मनोरंजनासाठी सर्वात जास्त अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग वेबसाइट्सची प्रेक्षांकडून  वापर होत आहे.

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सध्या अनेक नवनवीन अॅप्स उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतात. यामध्येच नेटफ्लिक्सला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या लॉकडाउनच्या काळात नेटफ्लिक्स मालामाल झालं असून केवळ तीन महिन्यांमध्ये त्यांच्या नव्या युजर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे.

इंग्रजी वृत्ताचा वृतानुसार, लॉकडाउनच्या काळात घरात बसून कंटाळलेल्या अनेकांनी मनोरंजनासाठी विविध अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रिमिंग वेबसाइटचा आधार घेतला आहे. यात जगभरातल्या अनेकांनी नेटफ्लिक्सला सबस्क्राइबर  केलं आहे. त्यामुळे जगभरातून नेटफ्लिक्सला तब्बल १५.७७ मिलियन म्हणजे जवळपास १.५ कोटींपेक्षा जास्त नवे सब्सक्राइबर्स मिळाले आहेत. या लॉकडाउनच्या काळात जवळपास ६४ मिलियन लोकांनी ‘टायगर किंग’ डॉक्युमेंट्री पाहिली आहे. तर नेटफ्लिक्सचा ओरिजन चित्रपट ‘सस्पेंसर कॉन्फेंडेशिअल’ला ८५ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. नेटफ्लिक्सप्रमाणेच ऑल्ट बालाजीच्यासबस्क्राइबरमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. या कंपनीला १७ हजार नवे सबस्क्राइबर  मिळाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.