नेटफ्लिक्‍सचे वर्चस्व संपले?

“ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर अमेझॉन प्राईम व्हिडिओची वेब सिरीज “द बॉईज’ हिट होते आहे, प्राईम व्हिडिओची ही वेबसिरीज आतापर्यंतची सर्वात हिट वेबसिरीज बनली आहे, ” द बॉईज’ या वेब सिरीजमुळे नेटफ्लिक्‍सवर यावर्षी सर्वात यशस्वी ठरलेली वेबसिरीज “द अंब्रेला अकॅडमी’ही मागे पडली आहे.

जगभरात आता सिंगल स्क्रीन किंवा मल्टिप्लेक्‍सपेक्षाही वेब सिरीजची प्रचंड क्रेझ वाढली आहे. ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर कॉमिक पुस्तकांवर आधारित टीव्ही सिरीयलला प्राधान्य मिळाले आहे. मार्वल कॉमिक्‍स आणि डीसी कॉमिक्‍सच्या गोष्टींवर बनलेले सिनेमे आणि वेब सिरीज अलीकडच्या काळात खूप लोकप्रिय झाले. आता या वेबसिरीजचा ट्रेंड आणखीन लोकप्रियता मिळवतो आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये “द अंब्रेला अकॅडमी’ सर्वात हिट ठरली होती. मात्र “द बॉईज’ रिलीज झाल्यानंतर “द अंब्रेला अकॅडमी’ चा प्रभाव पुसून गेला. “द अम्ब्रेला अकॅडमी’ पेक्षा 32% अधिक लोकप्रियता “द बॉईज’ने मिळवली होती. “द अंब्रेला अकॅडमी’ आणि “द बॉईज’ यांच्यातील लोकप्रियतेची रस्सीखेच 13-14 आठवडे सुरू होती.

भारतात हॉटस्टार, नेटफ्लिक्‍स, अमेझॉन प्राईम व्हिडिओ यासारखे ऑनलाईन स्ट्रीमिंगसाठीचे मोबाईल ऍप लोकप्रिय आहेत त्यातच आता फ्लिपकार्टने देखील व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा लॉन्च केली आहे. त्यामुळेही नेटफ्लिक्‍सला मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून डिजीटल प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय वेबसिरीज देणाऱ्या नेटफ्लिक्‍सचे वर्चस्व आता समाप्त होताना दिसते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.