अद्वितीय भारतीय कथांचे युग नेटफ्लिक्‍सवर

'फाइण्डिंग अनामिका'मध्‍ये माधुरी दिक्षितच्‍या रहस्‍यमय गायब होण्‍याचा उलगडा

आपला देश सुंदर, वैविध्‍यपूर्ण कथा, या कथांना प्रत्‍यक्ष जीवनात आणणारे प्रतिभावान कथाकार व टीम, पडद्यावर लक्ष वेधून घेणा-या अविश्‍वसनीय कलाकारांनी भरलेला आहे.

नेटफ्लिक्‍समध्‍ये आपल्याला एकत्र आणणा-या कथा सांगण्‍यास आवडते. भारतीय निर्मात्‍यांनी तुम्‍हाला आवडणारे, तसेच नवीन आवाज उठवणारे चित्रपट व सिरीज सादर केल्या आहेत. पण आपण सर्वांना आवडणारी एकच कथा कशाप्रकारे ओळखू शकतो? आपण ते करू शकत नाही. आपल्‍या प्रत्‍येकाची स्‍वत:ची विशिष्‍ट आवड व मूड्स आहे. आपल्‍या सर्वांना आपले जीवन पडद्यावर दिसावे असे वाटते.

आमच्‍या आगामी लाइनअपमध्‍ये आतापर्यंत न दिसण्‍यात आलेली विविधता आहे. सुपरहिट चित्रपट व सिरीज ते लक्षवेधक माहितीपट व रिअॅलिटी आणि आकर्षक विनोदी शैलीपर्यंत आम्‍ही भारतामध्‍ये आगामी मोठी झेप घेत तुमच्‍यासाठी देशाच्‍या कानाकोप-यातील ४० हून अधिक शक्तिशाली व आकर्षक कथा घेऊन येत आहोत.

लवकरच सादर केली जाणार आहे धाडसी व उत्‍साही सिरीज ‘बॉम्‍बे बेगम्‍स’, नात्‍यासंबंधी ड्रामा ‘अजीब दास्‍ताँ’, विलक्षण ‘पगलाईत’, प्रेम व दुरावासंबंधित ‘मीनाक्षी सुंदरेश्‍वर’ आणि महत्त्वाकांक्षेच्‍या परिणामांना दाखवणारी सिरीज ‘पेंटहाऊस’. तसचे धनुष अभिनीत ‘जगमे थंधीराम’, तापसी पन्‍नू अभिनीत ‘हसीना दिलरूबा’, कार्तिक आर्यन अभिनीत ‘धमाका’, अर्जुन कपूर व नीना गुप्‍तासह कौटुंबिक ड्रामा ‘सरदार का ग्रॅण्‍डसन’, आधुनिक रोमांसचा डोस सादर करणारी सिरीज ‘फिल्‍स लाइक इश्‍क’ आणि आर माधवनची विनोदी सिरीज ‘डिकपल्‍ड’ या सिरीज देखील सादर केल्‍या जाणार आहेत.

रवीना टंडनचा रहस्‍यमय थ्रिलर ‘अरण्‍यक’सह भय व तणावाचा अनुभव घ्‍या, पहा अत्‍यंत विलक्षण प्रेमकथा ‘ये काली काली आँखें’, भेटा जीतू भैयाला पुन्‍हा एकदा’कोटा फॅक्‍टरी’मध्‍ये, कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मासोबत खदखदून हसा आणि सिरीज ‘फाइण्डिंग अनामिका’मध्‍ये लाखो हृदयांची राणी माधुरी दिक्षित नेनेच्‍या रहस्‍यमय गायब होण्‍याचा उलगडा पहा.

ही फक्‍त येणारे चित्रपट व सिरीजची माहिती आहे. आम्‍ही भारत व जगभरातील सर्वोत्तम आणि प्रतिभावान निर्माते व प्रतिभावान व्‍यक्‍तींच्‍या संपन्‍न व वैविध्‍यपूर्ण कथा सादर करण्‍यास खूपच उत्‍सुक आहोत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.