तेल अविव : इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज फोनवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी इराण आणि इराणच्या पाठिंब्याने सक्रिय असलेल्या सशस्त्र गटांविरोधात सातत्याने सक्रिय राहण्याचा आपला इरादा स्पष्ट केला.
इस्रायलने हमासविरोधात सुरू केलेल्या युद्धामध्ये पुर्ण विजय मिळवणे इस्रायलसाठी आवश्यक असल्याचेही ट्रम्प यांना सांगितल्याचे नेतान्याहू म्हणाले. ट्रम्प यांच्याबरोबरचा संवाद मैत्रीपूर्ण, सौहार्दपुर्ण वातावरणात आणि खूप महत्वाचा होता, असे नेतान्याहू यांनी माध्यमांना सांगितले. हमासने अपहरण केलेल्या सर्व ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलकडून अथकपणे प्रयत्न केले जात आहेत.
याविषयी जितके कमी बोलले जाईल, तितके अधिक यश मिळेल. सीरिया आता पुर्वीचा सीरिया राहिलेला नाही. लेबेनॉन आता पुर्वीचा लेबेनॉन राहिलेला नाही, मध्यपूर्वेत निश्चितच बदल घडवला जाईल, असेही आपण ट्रम्प यांना सांगितल्याचे नेतान्याहू यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.