नेट परीक्षा 20 ते 28 जून दरम्यान

पुणे – सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा यंदा 20 ते 28 जून रोजी होत आहे. ही परीक्षा दुसऱ्यांदा ऑनलाइन पद्धतीने होत आहे.

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) आता नेट परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी 1 ते 30 मार्च या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा येत्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे.

“एनटीए’मार्फत एकूण 84 विषयांसाठी 91 ठिकाणी ही परीक्षा घेण्यात येत आहे. सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोपिशसाठी घेण्यात येणारी नेट परीक्षा दोन सत्रात होईल. पहिले 9.30 ते 12.30, तर दुसरे 2.30 ते 5.30 या वेळेत होत आहे. हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)