काठमांडू – नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहाल प्रचंड यांनी आज संसदेमध्ये मांडलेल्या विश्वास दर्शक ठरावावारील मतदाना दरम्यान बहुमत सिद्ध केले. प्रचंड यांच्या बाजूने 172 मते पडली, तर प्रचंड यांच्याविरोधात 82 सदस्यांनी मतदान केले.
नेपाळी कॉंग्रेस आणि सीपीएन-माओवादी केंद्रासह राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी, जनता समाजवादी पार्टी नेपाळ, सीपीएन-युनिफाइड सोशालिस्ट, लोकतांत्रिक समाजवादी पार्टी नेपाळ, जनता पार्टी, नागरिक उन्मुक्ती पार्टी, राष्ट्रीय जनमोर्चा आणि आम जनता पार्टी यांनी त्यांच्या बाजूने मतदान केले.
North Korea : “8 लाख लोकांना अमेरिकेशी युद्ध हवे आहे, त्यासाठी…”; उत्तर कोरियाचा दावा
तर सीपीएन-यूएमएल आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने त्याच्या विरोधात मतदान केले. तर नेपाळ वर्कर्स आणि पीजंटस पार्टीच्या सदस्यांनी मतदान केले नाही. गेल्या तीन महिन्यात प्रचंड यांनी दुसऱ्यांदा संसदेत बहुमत सिद्ध केले आहे.