चीनकडून नेपाळला 56 अब्ज रुपयांची मदत

काठमांडू – नेपाळच्या विकास कार्यक्रमांना मदत करण्यासाठी चीन येत्या दोन वर्षांत नेपाळला 56 अब्ज नेपाळी रुपयांची मदत करेल, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी रविवारी 20 करार केले.

शी जिनपिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दोन दिवसीय अनौपचारिक शिखर परिषदेनंतर शनिवारी येथे दाखल झाले. त्यानंतर जिनपिंग यांनी शनिवारी नेपाळच्या अध्यक्षा विद्या देवी भंडारी यांच्याशी चर्चा केली. रविवारी जिनपिंग यांनी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली.

या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी परिवहन, कृषी, उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा अशा विविध क्षेत्रांत 18 सामंजस्य करार आणि दोन पत्रांच्या देवाणघेवाणीवर स्वाक्षऱ्या केल्या. जिनपिंग आणि पंतप्रधान ओली यांच्यात झालेल्या भेटीत नेपाळ-चीन संबंधांच्या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित केले गेले.

2010 च्या विनाशकारी भूकंपानंतर काठमांडूला जोडणारा अर्णिको महामार्ग तातोपानी ट्रांझिट पॉईंटशी जोडण्यासाठी आणि संलग्नता अधिक सुलभ करणारे आणखी कस्टम पॉइंट्‌स उघडण्याचे आश्वासन जिनपिंग यांनी दिले आहे. नेपाळचा विकास आणि समृद्धी होईल, यासाठी आपण भंडारी यांनी संबंध, मैत्री आणि भागीदारी विकसित करण्यास सहमती दर्शविली असल्याचे जिनपिंग यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.