नवी दिल्ली – योगगुरू रामदेव बाबा यांनी करोनावर प्रभावी असल्याचा दावा करत काही दिवसांपूर्वी कोरोनिल कीट लॉन्च केली आहे. या किटचं लॉन्चिग केंद्रीमंत्री आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलं होतं. त्याचवेळी जागतिक आऱोग्य संघटनेने अशा प्रकारच्या कोणत्याही किटला मान्यता देण्यात आलं नसल्याचं म्हटलं होतं. यावरून मोठा वाद झाला होता. आता रामदेव बाबा यांनी हे किट आपल्या शेजारील नेपाळला भेट म्हणून पाठवल्या आहेत.
रामदेव बाबांच्या पतंजलीच्या वतीने निर्मित करण्यात आलेल्या करोनिल किटच्या वितरणावर नेपाळमध्ये बंदी घातली आहे. विशेष म्हणजे रामदेव बाबांनी ही करोनिल कीट भेट म्हणून पाठवली होते. नेपाळ सरकारने म्हटलं की, करोना संसर्गावर कोरोनिल किट प्रभावी औषध ठरल्याचा काही ठोस पुरावा नाही. त्यामुळे याच्या वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.
नेपाळच्या डिपार्टमेंट ऑफ आय़ुर्वेद अँड अल्टरनेटीव्ह मेडीसिनच्या आदेशात म्हटलं की, कोरोनिलचे १५०० किट खरेदी करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कोरोनिलच्या वितरणाचे काम तत्काळ रोखण्यात येत आहे.
नेपाळ सरकारच्या आदेशात नमूद करण्यात आलं की, कोरोनिल किटमधील गोळ्या आणि नाकात टाकण्यात येणारे तेल करोनाविरुद्ध लढणाऱ्या औषधांच्या तोडीचं नाही. मात्र नेपाळ मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट केलं की, पतंजलीच्या प्रोडक्टवर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आलेली नाही.
दरम्यान नेपाळ आरोग्यमंत्रालयाचे प्रवक्त्याने म्हटलं की, नेपाळ सरकारने कोरोनिलवर बंदी घालण्यासंबंधी अधिकृत कोणताही आदेश अद्याप जारी केलेला नाही. त्याचवेळी त्यांनी कोरोनिलवरून भारतात झालेल्या वादाला अधोरेखित केलं आहे.