वृत्तसंस्था – ज्येष्ठ ब्रिटीश शास्त्रज्ञ नील फर्ग्युसन यांनी इशारा दिला आहे की, लोकांनी करोना हा किरकोळ आजार राहील असे समजू नये. लोकांना अजूनही अनेक वर्षे सावध राहण्याची गरज आहे. याशिवाय, करोनाच्या नवीन व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’बद्दल बोलताना ते म्हणाले की, ओमायक्रॉनचा धोका डिसेंबरनंतरच कळेल. सध्या हा नवीन व्हेरियंट समजून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
फर्ग्युसन यांनी कॉमन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिटीला सांगितले की, जोपर्यंत लोक रुग्णालयात दाखल होतात, तोपर्यंत बहुतांश पसार झालेला असतो. श्वसनमार्गामध्ये विषाणू खूप वेगाने उत्परिवर्तित होतात आणि वातावरणात बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. हा विषाणू 10 दिवसांनंतरही एखाद्याचा जीव घेऊ शकतो. त्यासाठी फर्ग्युसन यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.