मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका ‘नेहा कक्कड’ने जगभरातील अनेक गायकांना आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने धोबी पिछाड दिला आहे. नेहाने आता एक आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून उभारी घेतली असून जगभरातील लोकांना तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
View this post on Instagram
यातच नेहाचा हा फोटो पाहून ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात होते. मात्र या चर्चांवर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला होता. नेहाने तिच्या आगामी गाण्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहा बेबी बंपसोबत दिसत असून तिचा हा फोटो नव्या गाण्याचा एक भाग असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
View this post on Instagram
तर आता खयाल रखा कर हे गाणे रिलीज झाले आहे सध्या या गाण्याला आत्तापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नेहाचं नवं गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्यामध्ये नेहा कक्करच्या खयाल रखा कर या गाण्यामध्ये एक छानशी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे.
दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी नेहा कक्कर रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेहा आणि रोहनप्रीत सातत्याने चर्चेत आहेत.