मुंबई – बॉलीवूडमधील आघाडीची आणि प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड ही आपल्या सिंगिंग टॅलेंटसह डान्ससाठीही ओळखली जाते. नेहा कक्कडने आपल्या अदा आणि नृत्याच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. नेहा कक्कडचे व्हिडिओ असू द्या की फोटो ते खूपच व्हायरल होत असतात.
View this post on Instagram
नेहा कक्कडने नुकताच एक व्हिडिओ चाहत्यांशी शेअर केला आहे. त्यात ती चष्मा घालून “काला चश्मा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. नेहासह तिचा पती रोहन प्रीत आणि भाउ टोनी कक्कड थिरकताना दिसत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ नेहा कक्कडने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या फॅनपेजवरून चाहत्यांशी शेअर केला आहे. या व्हिडिओत नेहा खूपच हॉट आणि सुंदर अशी दिसत आहे. सिल्वर शिमरी ड्रेसमध्ये ती काळा चष्मा घालत “काला चष्मा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर असंख्य लाइकस् आणि कमेंटस् मिळत आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास नेहा कक्कड सध्या सिंगीग रियलिटी शो “इंडियन आयडल’मध्ये जज म्हणून काम करत आहे. याशिवाय तिचे अनेक गाणे रिलीज झाले आहेत, ज्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
View this post on Instagram