बॉलिवूड गायिका नेहा कक्कडने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. नेहाच्या गाण्यांना प्रेक्षकांकडून खूपच पसंती मिळत असते. याशिवाय नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असते. अलीकडे नेहाने जाहीर केले की ती सोशल मीडियापासून अंतर ठेवत आहे. यासाठी तिने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती. पण नेहा सोशल मीडियावर पुन्हा परतली आहे.
नेहाने इंस्टाग्रामवर इंडियन आयडल शोचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्पर्धकांसह स्टेजवर मस्ती करताना दिसत आहे. या पोस्टवर नेहाचे चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओला 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. दरम्यान, नेहाने इंस्टाग्रामवर सोशल मीडियापासून दूर होण्याविषयी माहिती दिली होती.
तिने लिहिले होते की, मी आता झोपायला जात आहे. जेव्हा हे जग चांगले होईल तेव्हा कृपया मला उठवायला या. असे जग ज्यामध्ये स्वातंत्र्य, प्रेम, आदर, काळजी, मजा, स्वीकृती आणि चांगले लोक असतील. न की द्वेष, घराणेशाही, मत्सर, गुंडगिरी, खून, आत्महत्या आणि वाईट प्रवृत्तीचे लोक. शुभ रात्री. काळजी करू नका मी फक्त काही दिवस दूर जात आहे, असे म्हटले होते.