मुंबई – बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्करची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. तिने आपल्या सौंदर्य आणि गोड आवाजाने चाहत्यांची मने जिंकली आहे. तसेच ती सतत चाहत्यांशी आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. सध्या नेहा एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओत नेहा तिच्या कुटुंबासोबत स्विमिंगपूलमध्ये होळीचा आनंद लुटताना दिसत आहे. यावेळी नेहासह तिचा पती रोहनप्रीत आणि भाऊ टोनी कक्कर देखील दिसत आहे. नेहा पूलमध्ये पती रोहनप्रीत सोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेहाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत नेहा आणि रोहनप्रीतची केमेस्ट्री दिसून येत आहे.
View this post on Instagram
नेहाचे संपूर्ण कुटुंब प्री होळी साजरी करताना दिसत आहे. व्हिडिओत लहानांपासून मोठ्यांनी देखील गाण्यांवर ताल धरला आहे. नेहाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये “मारू पिचकारी होके लेफ्ट, होके राइट…’ असे लिहिले आहे. लग्नानंतर नेहाची पहिली होळी असल्यामुळे ती अत्यंत आनंदी दिसत आहे. नेहा तिची पहिली होळी ऋषिकेशमधील तिच्या घरी साजरी करत आहे.
View this post on Instagram
नेहाचा होळीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिने हा व्हिडिओ काही तासांपूर्वीच पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 1.9 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून असंख्य लाईक मिळत आहे.
View this post on Instagram