नेहा कक्करच्या लग्न सोहळ्याचे फोटो तुफान व्हायरल, पहा किती आहे ‘या’ लेहंग्याची किंमत
मुंबई- गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रित सिंह दोघेही नुकतेच विवाह बंधनात अडकले. यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या अनेक वेडिंग सेरेमनीचे व्हीडियोसुद्धा व्हायरल झालेत.
वेडिंग सेरेमनीच्या वेगवेगळ्या सेरेमनीत तिने अनेक नवनवीन सुंदर वेशभूषेत ती दिसते आहे. या सगळ्या फोटोची चाहतेच नाही तर अनेक सेलेब्रिटीसुद्धा हे फोटो पाहण्यासाठी आतूर होते.
तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करताच या फोटोंवर चाहत्यांकडून आणि अनेक सेलेब्रिटी मित्रपरिवाराकडून कमेंट्स मार्फत शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. मात्र या सगळ्यात आकर्षक ठरले ते म्हणजे तिच्या या सोहळ्यात तिने परिधान केलेले लेहंगे.
या लेहंग्यात मेहंदी सेरेमनीत परिधान केलेला हिरव्या रंगाचा लेहंगा सगळ्यात सुंदर लुक देणारा लेहंगा ठरला. चाहत्यांनी या लेहंग्याची किंमतही कमेंट्समध्ये विचारला आहे. या लेहंग्याची किंमत 75 हजार रुपये असल्याचं समजतंय.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा