बॉलीवूड गायिका नेहा कक्कडचे लग्न ठरले आहे. पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगबरोबर याच महिन्यात तिचा विवाह होणार आहे. या दोघांचा विवाह 24 ऑक्टोबरला होणार आहे. अलीकडेच दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. “डायमंड का छल्ला’ या अल्बमच्या शूटिंगच्यावेळी दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमधील मैत्री प्रेमात रूपांतरित झाली आणि मग त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
अर्थात, या विवाहाबाबत दोघांपैकी कोणीही अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही. नेहा कक्कड आणि रोहनप्रीत सिंग यांच्यातील अफेअरची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी या रिलेशनशीपचे कन्फर्मेशन दिले होते. नेहा कक्कड आणि ऍक्टर हिमांश कोहलीदरम्यान डेटिंगची चर्चा बरेच दिवस गाजली होती.
त्यानंतर त्यांच्यातील ब्रेक अपचीही चर्चा खूप रंगली होती. गायक आदित्य नारायणबरोबरही नेहाचे नाव जोडले जाऊ लागले होते. पण ती चर्चा अधांतरीच संपली होती. गर्लफ्रेंड श्वेता अगरवालबरोबर आदित्यचे रिलेशन जाहीर झाले आणि अखेर रोहनप्रीत सिंगचे नाव नेहाबरोबर निश्चित झाले. आता हे समीकरण तरी निश्चित समजले जाईल, अशी आशा करूयात.