बॉलीवूड अभिनेत्री नेहा धूपियाचे प्रेग्नेंसी काळात खूप वजन वाढले होते. या काळात अनेकांनी त्यावर कमेंट करत तिला ट्रोल केले आणि तिचे करियर आता संपणार असल्याचे भाकित केले. परंतु यावर नेहाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. नेहाने एका मुलाखतीत प्रेग्नेंसीच्या काळात शरीरात झालेल्या बदलांबाबत माहिती दिली.
View this post on Instagram
नेहा म्हणाली, आपण जेव्हा एखाद्या नवीन जीवाला जन्म देत असतो, तेव्हा तो जीवनातील सर्वात आनंदी काळ असतो. परंतु जेव्हा त्याचा जन्म होतो आणि आपण स्वतःकडे पाहतो तेव्हा थोडेसे विचित्र वाटते. प्रेग्नेंसीच्या काळात माझे वजन 23-25 किलोंनी वाढले होते.
View this post on Instagram
लॉकडाउनच्या काळातील 8 महिन्यात मी तब्बल 21 किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे ज्यांनी माझे वजन वाढले होते म्हणून ट्रोल केले होते. त्यांना हे उत्तर आहे. अनेकांनी माझे करियर संपणार असल्याचेही बोलले होते.
View this post on Instagram
पण त्याचा कोणताही परिणाम मी होवू दिला नाही. लॉकडाउनमध्ये मी पुन्हा एकदा माझा शेप मिळविला आहे. दरम्यान, नेहा धूपियाने 10 मे 2018मध्ये अभिनेता अंगद बेदी याच्यासोबत दिल्लीत गुपचुप लग्न केले होते.