किनहासा – कांगो नदीत सुमारे ७०० प्रवासी असलेले जहाज उलटल्याची धक्कादायक घटन घडली आहे. आफ्रिकेतील कांगो देशात ही नदी असून या घटनेत ७०० पैकी ३०० जणांना वाचविण्यात यश आले असून अद्याप १०० जण बेपत्ता आहे. तर ६० जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचे समजते.
माई-नोमडबे प्रांतातमध्ये ही घटना घडली. ते जहाज किनहासा प्रांतातून मबनडाका येथे जाण्यासाठी रवाना झाले होते. माय-नोमडबे प्रांतातील लोंगगोला इकोटी गावाजवळ जहाज पोहोचल्यानंतर दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे जहाज उलटल्याचे कांगो देशाचे मंत्री स्टीव मबिकायी यांनी म्हटले आहे.
जहाजातून ७०० प्रवासी प्रवास करत होते. यापैकी ३०० जणांना वाचवण्यात यश आले असून, ६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० जण बेपत्ता आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान कांगो नदीचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जातो. कांगो देशातील रस्त्यांची स्थिती दयणीय आहे. त्यामुळे येथील लोक कांगो नदीतून प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र जहाजातून क्षमतेपेक्षा अधिक लोक प्रवास करत असल्याने अशा दुर्घटना वारंवार घडतात, असे सांगितले जात आहे.