अतिक्रमण हटवत नाही म्हणून भाजपा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या सभेतच घडला प्रकार

भंडारा: ऊर्जामंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्षच भाजप कार्यकर्ताने अतिक्रमण हटवत नाही म्हणून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाचा व्हिडीओ शेअर करत भाजपाच्या नेत्यांना सत्तेची मस्ती चढल्याचा आरोप केला आहे.

शासकीय जागेवरचे अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी भाजपाचेच माजी नगरसेवक आणि माळी समाजाचे नेते अरुण भेदे वारंवार निवेदन देत होते. या मागणीसाठी त्यांनी आंदोलनही केले होते. पण त्यापैकी कशाचाच उपयोग झाला नाही. पाठपुरावा करूनही भाजपा सरकार आणि मंत्री दखलच घेत नसल्यामुळे त्यांनी आज पालकमंत्री बावनकुळे यांच्या समोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. भाजपाचे सरकार आणि मंत्री आपल्या नेत्यांची वा कार्यकर्त्यांचीही दखल घेत नसतील, तर ते सामान्य जनतेच्या प्रश्नांची दखल काय घेणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/459324327967471/

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)