सातारा – परदेशातून प्रवास करून आलेल्या दोन तरुणांमध्ये करोनासदृश्य लक्षणे आढळून आले होती. यामुळे त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या दोघांचेही रिपोर्ट आता निगेटिव्ह आले आहेत.
शारजाह (युएई) येथून प्रवास करुन आलेला सातारा जिल्ह्यातील २९ वर्षे वयाच्या युवकाला सर्दी व घसा दुखत असल्याने तसेच सौदी अरेबिया येथून प्रवास करुन आलेला एक २२ वर्षीय युवकाला सर्दी व ताप असल्याने जिल्हा रुग्णालयात करोनाचा संशयित रुग्ण म्हणून १८ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही युवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.