मुंबई – देशातील व परदेशातील नकारात्मक परिस्थितीचा शेअर निर्देशांकावरील दबाव कायम आहे. सोमवारी आशियायी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले, परदेशाी गुंतवणूदारांची विक्री कायम राहीली तर कंपन्यानी नफादायक नसलेले ताळेबंद जाहीर केले. त्यामुळे शेअर बाजारात कमालीचे नकारात्मक वातावरण आहे.
बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 9 अंकानी वाढून 79,496 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6 अंकानी म्हणजे 0.03 टक्क्यानी कमी होऊन 24,141 अंकांवर बंद झाला. एशियन पेंट्स कंपनीचा शेअर आज 8 टक्क्यानी कोसळला. या कंपनीला दुसर्या तिमाहीत झालेल्या नफ्यात 43 टक्क्याची घट होऊन नफा केवळ 693 कोटी रुपये इतका झाला आहे. उत्सवाच्या काळातही रंगांची मागणी वाढली नाही.
टाटा स्टील, बजाज फायनान्स, महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, अदानी पोर्टस्, बजाज फिनसर्व्ह, लार्सन अॅण्ड ट्यूब्रो या कंपन्यानी आज मार खाल्ला. पावर ग्रीड, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टिसीएस, आयसीआयसीआय बँक या कंपन्याच्या शेअरच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली.
अमेरीकेतील घडामोडीचा शेअर बाजारावर परिणाम होत आहे. मागणी कमी झाल्यामुळे कंपन्याचे ताळेबद नकारात्मक जाहीर होत आहेत. याचा गुंतवणूदारांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून आता गुंतवणूदार तळाचा अंदाज घेत आहेत. आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्यामुळे भारतीय बाजारात नकारात्मक वातावरण होते. युरोपातील निर्देशांक वाढले. त्याचबरोबर अमेरीकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी वाढत आहेत. मात्र त्याकडे देशातील गुंतवणूकदार दूर्लक्ष करीत आहेत. स्मॉल कॅप, मिड कॅपबरोबरच धातू, ग्राहक वस्तू, वाहन व तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रांचे निर्देशांक कमी झाले.
परदेशी गुंतवणूदांची विक्री चालूच असून काल या गुंतवणूदारांनी 3,404 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. दरम्यान लवकरच महाागईची आकडेवारी जाहीर होणार आहे. ती वाढण्याची शक्यता असल्यामुळे रिझर्व्ह बँक पुढील महिन्यातही व्याजदर कपात करणार नाही असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे गुंतवणूदार कुंपणावर बसून आहेत.