मोठी बातमी! NEET PG-2021 परीक्षादेखील लांबणीवर

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली माहिती

नवी दिल्ली  – देशात पुन्हा करोनाची लाट आल्याने रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर नियोजित परीक्षा घेण्यात अडथळा येत असल्याने त्या रद्‌द किंवा पुढे ढकलण्यात येत आहे. केंद्र सरकारने नुकताच सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला असताना, आता NEETPG – 2021 परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

अगोदर ही परीक्षा 18 एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर ठरवली जाणार आहे. मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्‌विट डॉ. हर्ष वर्धन यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.