पुणे – करोना संकटात काही विद्यार्थ्यांना “नीट’ची परीक्षा देता आली नाही. त्यांना ती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली.
त्यांची परीक्षा दि. 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर देशभरातील “नीट’ परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य “नीट’ परीक्षा देशभरात 13 सप्टेंबर रोजी 3,843 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. त्यावेळी देशभरातील जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे दिवसभरात निकाल कधीही जाहीर होईल, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.