लंडनमध्ये दिसला नीरव मोदी

नवी दिल्ली – भारताचे अब्जावधी रूपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेल्या नीरव मोदी बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून निरव मोदी सध्या लंडनमधील वेस्ट एंड भागात एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आरामात राहत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने खुलासा करण्यात आला आहे.

याबाबत सवितर वृत्त असे, भारतातून अब्जावधी रूपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळ काढलेल्या नीरव मोदीचा एका इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने मागोवा घेतला आहे. यावेळी निरव मोदीला त्याने घेतलेल्या कर्जाबाबत तसेच भारतामध्ये परतण्याविषयी प्रश्न विचारले असता त्याने ‘नो कॉमेट्स’ असे उत्तर दिले.तत्पूर्वी भारत सरकारच्या रडारवर असलेला नीरव मोदी हा आपल्याच देशात असल्याची कबुली ब्रिटनने दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.