नवी दिल्ली – भालाफेकमध्ये टोकियो ऑलिम्पिकचे सुवर्णपदक मिळवल्यानंतर भारताच्या नीरज चोप्राने नवे उद्दिष्ठ ठेवल्याचे सांगितले आहे.
येत्या काळात विश्वकरंडक स्पर्धा होत असून त्यात 90 मीटरचे अंतर नोंदवण्याचा माझा प्रयत्न राहणार असून त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करणे सोपे ठरणार आहे, असेही नीरज म्हणाला.
90 मीटर अंतर नोंदवणे यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये शक्य झाले नाही. नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला आशियाई खेळाडू आहे.
याआधी कोणत्याही आशियाई पुरुष खेळाडूला भालाफेकमध्ये सुवर्णच नव्हे तर पदकही मिळवता आले नव्हते. इतकेच नव्हे तर ऑलिम्पिकमध्ये गेल्या 50 वर्षात केवळ तीनच पुरुष खेळाडूंनी पहिल्यात प्रयत्नात भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकण्याची कामगिरी केली असून त्यात नीरजचा समावेश आहे.